(नवी दिल्ली)
शिवसेना सचिव तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकारने कोणती पाऊले उचलली आहेत? तसेच हे विमानतळ नागरी यात्रा सुरू करण्यासाठी पुर्णपणे तयार आहे तर तो सुरु करण्यास विलंब का होतोय…? तो सुरू होण्यासाठी कोणत्या गोष्टींमुळे विलंब होतोय याचे डीटेल्स…? तसेच हे विमानतळ लवकरात लवकर सुरू करण्यास सरकारने अद्याप कोणती कार्यवाही केली ? याचा खुलासा मागितला होता.
याबाबत केंद्रीय नागरी विमान राज्यमंत्री ना. डॉ.विजयकुमार सिंह (सेवानिवृत्त) म्हणाले की, रत्नागिरी विमानतळ हे भारतीय तटरक्षक दलाच्या अधीन असून उडान (RCS) ज्या विमानतळांचा समावेश केला गेला आहे तेथील पुर्नविकास होणे गरजेचे आहे. तसेच अशा विमानतळांचा स्तर उंचावणे आवश्यक असून त्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणजेच सिव्हील टर्मीनल भवन, समांतर टॅक्सी ट्रॅक, नेव्हीगेशन सेंटर या करीता महाराष्ट्र राज्य सरकारने जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे यावेळी त्यांचेकडून सांगण्यात आले.