रत्नागिरी : Covid-19 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे, राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच प्रधान सचिव यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांना विशेष पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
हा सन्मान माझ्या प्रमाणेच रत्नागिरी जिल्हा वासियांचा असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले आणि ३० नोव्हेंबर पर्यंत लसीचा पहिला डोस शंभर टक्के पुर्ण होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी केले आहे.
दरम्यान १६ नोव्हेंबर पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील १३ लाख ४२ हजार ०६१ जणांनी लस घेतली असल्याचे सांगितले. हर घर दस्तक अभियानाव्दारे रत्नागिरी जिल्ह्यात आरोग्य पथकांव्दारे विशेष मोहीम सुरु करण्यात आली असून त्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पाटील म्हणाले.