(जाकादेवी / हनुमंत कदम)
नवजीवन विद्यालय फुणगूस मधील सहाय्यक शिक्षक श्री. सुरेश श्रीरंग रणदिवे यांनी आपली कन्या कुमारी शिवन्या हिचा 9 मार्च हा सातवा वाढदिवस निवळी फाट्याजवळील समर्थनगर येथील ‘माहेर संस्थेत’ साजरा केला.
‘जे का रंजले गांजले l त्यासी म्हणे जो आपुले ll ‘या जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाचा प्रत्यय त्या दिवशी सर्वांना आला.
त्यांच्या समवेत स्नेहभोजनाचाही आनंद घेतला.
तसेच या स्नेहभोजनासाठी रूपये 7000/ – ची देणगी दिली. माहेर संस्थेचे अधिक्षक, प्रकल्प प्रमुख, श्री. सुनिल कांबळे, समाजसेविका शितल हिवराळे, श्री. हनुमंत कदम, श्री. उत्तम देशमुख, सौ. उज्वला देशमुख व श्री.मंदार भागवत यांनी कुमारी शिवन्याला शुभेच्छा दिल्या. या सेवाभावी उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन केले. रणदिवे परिवाराने माहेर संस्थेचे आभार मानले.
श्री.सुरेश रणदिवे व त्यांच्या कुटुंबीयांचा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य, अभिनंदनीय व अनुकरणीय असाच आहे.