शरीरात हिमोग्लोबिन / रक्त किती असावे
- पुरुषांमध्ये सामान्यपणे हिमोग्लोबिन अर्थात रक्ताचे प्रमाण 13.5 ते 17.8 ग्राम प्रति डेसी लिटर असायला हवे.
- स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीन रक्ताचे प्रमाण सामान्यपणे 12 ते 15 ग्राम डेसी लिटर असायला हवे
हिमोग्लोबिन कमी होण्याची कारणे
शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन न मिळाल्याने हिमोग्लोबिनची कमतरता होऊ लागते. महिलांमध्ये गर्भवती झाल्यावर सामान्यपणे हिमोग्लोबिन च्या स्तरात कमी निर्माण होते. याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन अर्थात रक्ताचे प्रमाण कमी होते. रक्त कमी होण्याची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- कॅन्सर
- ल्युकेमिया
- आयरन ची कमतरता
- एच आय व्ही एड्स
- जखमेतून अधिक प्रमाणात रक्त निघणे
- अनुवंशिक समस्या
- मुळव्याध
- मासिक पाळीत अधिक रक्त जाणे
- विटामिन ची कमतरता
- नेहमी रक्तदान करणे
- धूम्रपान करणे
- अत्याधिक प्रमाणात व्यायाम करणे
हिमोग्लोबिन रक्त कमी होण्याची लक्षणे
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास पुढील लक्षणे पहावयास मिळू शकतात
- डोकेदुखी
- श्वास घेण्यात समस्या
- चक्कर येणे
- बेचैन वाटणे, चिडचिडेपणा
- थकवा वाटणे
- कमजोरी येणे
- हात पाय थंड पडणे
- हृदयाची धडधड वाढणे
- त्वचेचा रंग हलका दिसू लागणे
- हात आणि पायाची नखे कमजोर होणे
- तोंडात छाले
- मासिक पाळी व्यवस्थित न होणे
रक्त व हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी घरगुती उपाय
शरीरातील रक्त अर्थात हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढविण्यासाठी आपण पुढील घरगुती उपाय करू शकतात व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे यासाठी पुढील माहिती वाचा.
- बीट : लाल बीट त्वचा आणि केसांसाठी उपयोगी असते परंतु या सोबतच ते शरीरातील आयरन ची कमतरता देखील भरून काढते. आयरन ची कमतरता झाल्यास बीट खाण्याची सल्ला दिली जाते. बीट शरीरातील लाल रक्त पेशींना वाढवण्याचे कार्य करते यासोबतच मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या समस्या देखील बीट कमी करते.
- केळी : केळी आयरन सोबतच अनेक विटामिन आणि खनिजांचा स्त्रोत असतात. ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल त्यांनी याच्या उपचार म्हणून नियमित केळी खायला हवी.
- मध : मध अनेक रोगांमध्ये उपयोगी आयुर्वेदिक औषध आहे. मधाचे सेवन केल्याने रक्ताची कमी व एनिमिया सारख्या रोगांना दूर करता येते. यासाठी एक लिंबू रस एक ग्लास पाण्यात टाकावा व यामध्ये एक चमचा मध टाकुन नियमित या पाण्याचे सेवन करावे. असे केल्यास जलद रक्त वाढवण्यात मदत मिळते. कारण मधामध्ये अनेक पोषकतत्वं असतात. मधामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि शरीराला पुरेशी ऊर्जादेखील मिळते. शंभर ग्रॅम मधामधून शरीराला ०.४ ग्रॅम लोह मिळू शकते.
- हिरव्या भाज्या : हिरव्या भाज्यांमध्ये पालक रक्त वाढवण्यासाठी चे औषध म्हणून प्रसिद्ध आहे. पालक मध्ये भरपूर प्रमाणात लोह तत्व आढळते. यासाठी तुम्ही पालकच्या भाजीत लिंबूचा रस टाकून तिचे सेवन करू शकता.
- खजूर आणि मनुके : खारीक-खजूर व मनुके आणि किशमिश सुक्या मेवा मधील रक्त वाढवणारे प्रसिद्ध पदार्थ आहेत. जर आपण शरीरातील रक्ताची कमतरता कमी करू इच्छिता तर नियमित खजूर आणि किशमिश खाणे सुरू करा. खजूर आणि मनुके सेवन शरीरामध्ये आयरन व हिमोग्लोबीन चे प्रमाण वाढवते. निरोगी जीवनशैलीसाठी मूठभर सुकामेवा दररोज खावा असे म्हटले जाते. सुकामेव्यातील अंजीर, जर्दाळू , बदाम, काळ्या मनुका, खारीक अशा अनेक ड्रायफ्रुट्समधून लोह मिळू शकते. शंभर ग्रॅम सुकामेवा खाण्यामुळे शरीराला पुरेसे लोह नक्कीच मिळू शकते.
- गुड आणि शेंगदाणे : 50 ग्राम बारीक केलेल्या गुड मध्ये मध्ये 100 ग्राम शेंगदाणे मिक्स करून दररोज सकाळी काही प्रमाणात याचे सेवन करावे. असे केल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण काही प्रमाणात वाढवले जाऊ शकते.
- पीनट बटर शेंगदाणे अथवा शेंगदाण्यापासून तयार केलेले पीनट बटर लोह मिळवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. दररोज नास्ता करताना ब्रेड आणि पिनट बटर खाऊ शकता. शंभर ग्रॅम पिनट बटर मधून १.९ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.
- टोमॅटो : टोमॅटो हे लोहाचा एक उत्तम स्त्रोत आहे. शिवाय टोमॅटोमधून व्हिटॅमिन सी आणि लोह दोन्ही गोष्टी मिळतात. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात भरपूर टोमॅटोचा वापर करा. शंभर ग्रॅम टोमॅटोमधून ०.८ मिलीग्रॅम लोह मिळू शकते.
- अंडे : संडे हो या मंडे रोज खाओ अंडे हे ऐकले असेलच. कारण अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. महत्त्वाचे म्हणजे अंडे खाण्यामुळे शरीराला लोह मिळते. एका अंड्यातून १.५९ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.
- डाळिंब : डाळिंबामध्ये लोहासोबत कॅल्शियम, प्रोटिन्स, फायबर आणि इतर अनेक व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. अशक्तपणा झाल्यास डाळिंबामुळे शरीराची झिज लवकर भरून निघते. शंभर ग्रॅम डाळिंबाच्या दाण्यातून अंदाजे ०.३ मिलिग्रॅम लोह मिळू शकते.
- सफरचंद : ‘अॅन अॅपल ए डे कीप्स द डॉक्टर अवे’ असे नेहमी बोलले जाते. कारण सफरचंदात लोहाचे प्रमाण भरपूर आहे. म्हणूनच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खाण्यास सांगितले जाते. एका सफरचंदातून अंदाजे ०.३१ लोह मिळू शकते.
- सी-फूड : सी फूडचे चाहते अनेक असतात. सीफूड मधून लोहदेखील मिळते. कोळंबी, सुरमई, बांगडा असे मासे आहारातून जरूर खा. ज्यामुळे शरीराला मुबलक लोह मिळेल.
लोहयुक्त आहार घेतल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन नक्कीच वाढू शकते. ज्यामुळे हळूहळू शरीरातील लाल रक्तपेशी नक्कीच वाढू शकतात. नियमित आहारात मटण, मासे, सोयाबीन, टोफू, अंडे, सुकामेवा, ब्रोकोली, हिरव्या पालेभाज्यां, बीट, गाजर असे पदार्थांचा समावेश करून आहारातील लोहाचे प्रमाण वाढवू शकता
सूचना : वरील प्रमाणे काही लक्षणे कींवा त्रास जाणवत असल्यास घरगुती उपायाबरोबरच एकदा डॉक्टर आणि विशेषज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.