(मुंबई)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवार (२३ मे २०२३) दुपारी जाहीर केला. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच युपीएससीव्दारे 2022 सालासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात 933 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यात इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला असून ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे (देशात २५वी) महाराष्ट्रात पहिली आली आहे. कश्मिराने यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात पहिल्या 100 जणांमध्ये 70 हून अधिक उमेदवार महाराष्ट्रातील आहेत.
यूपीएससी सीएसई प्राथमिक परीक्षा ५ जून २०२२ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २२ जून २०२२ ला जाहीर करण्यात आला. त्यानंतर १६ ते २५ सप्टेंबर दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, ज्याचा निकाल ६ डिसेंबरला जाहीर करण्यात आला होता. या परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांच्या १८ मे रोजी मुलाखत संपल्या. त्यानंतर मंगळवारी या परीक्षेत अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.
सन 2022 : युपीएससी परीक्षेत यंदा महाराष्ट्रातील 70 हून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाले
(25) कश्मिरा संखे, (28) अंकिता पुवार, (54) रूचा कुलकर्णी, (57) आदिती वषर्णे, (58) दिक्षिता जोशी, (60) श्री मालिये, (76) वसंत दाभोळकर, (112) प्रतिक जरड, (127) जान्हवी साठे, (146) गौरव कायंडेपाटील, (183) ऋषिकेश शिंदे, (214) अर्पिता ठुबे, (218) सोहम मनधरे, (265). दिव्या गुंडे, (266) तेजस अग्निहोत्री, (277) अमर राऊत, (278) अभिषेक दुधाळ, (281) श्रुतिषा पाताडे, (287) स्वप्निल पवार, (310) हर्ष मंडलिक, (348) हिमांषु सामंत, (349) अनिकेत हिरडे, (370) संकेत गरूड, (380) ओमकार गुंडगे (393) परमानंद दराडे, (396) मंगेश खिल्लारी, (410) रेवैया डोंगरे (445) सागर खरडे, (452) पल्लवी सांगळे (463) आशिष पाटील, (470) अभिजित पाटील, (473) शुभाली परिहार, (493) शशिकांत नरवडे, (517) रोहित करदम, (530) शुभांगी केकण, (535) प्रशांत डगळे, (552) लोकेश पाटील, (558) ऋतविक कोत्ते, (560) प्रतिक्षा कदम, (563) मानसी साकोरे, (570) सैय्यद मोहमद हुसेन, (580) पराग सारस्वत, (581) अमित उंदिरवडे, (608) श्रुति कोकाटे, (624) अनुराग घुगे, (635) अक्षय नेरळे, (638) प्रतिक कोरडे, (648) करण मोरे, (657) शिवम बुरघाटे, (663) राहुल अतराम, (665) गणपत यादव, (666) केतकी बोरकर, (670) प्रथम प्रधान, (687) सुमेध जाधव, (691) सागर देठे, (693) शिवहर मोरे, (707) स्वप्निल डोंगरे, (717) दिपक कटवा, (719) राजश्री देशमुख, (750) महाऋद्र भोर, (762)अकिंत पाटील, (790) विक्रम अहिरवार, (792) विवेक सोनवणे, (799) स्वप्निल सैदाने, (803) सौरभ अहिरवार, (828) गौरव अहिरवार, (844) अभिजय पगारे, (861) तुषार पवार, (902) दयानंद तेंडोलकर, (908) वैषाली धांडे, (922) निहाल कोरे.
या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू
भारतीय प्रशासन सेवा (IAS) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.
भारतीय विदेश सेवा (IFS) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.
भारतीय पोलिस सेवा (IPS) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20, इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.
यंदाच्या यूपीएससी परीक्षेत मुलींचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या चारमध्ये मुलींचाच समावेश आहे. इशिता किशोर देशात पहिली आली आहे. त्यानंतर गरिमा लोहिया दुसरी, उमा हरठी एन तिसरी आणि स्मृती मिश्रा देशात चौथी आली आहे.