(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी- खालगाव पंचक्रोशीतील युवा नेते प्रतिक सुधीर देसाई हे गेली अनेक समाजोपयोगी उपक्रमात सहभागी असतात. सेवाभावी वृत्तीमुळे जाकादेवी दशक्रोशीतील अनेक युवा कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे एकवटले असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी धावणारा एक युवा नेता म्हणून प्रतिक देसाईंकडे सर्वच राजकीय पक्षांचे ज्येष्ठ कार्यकर्ते व पक्षांचे नेते यांच्या गाठीभेटी होत आहेत. त्यामुळे ते आता नेमके कोणत्या पक्षाकडे जाणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकीय गाठीभेटी वाढत असल्याने प्रतिक देसाई त्यांनी आता कोणत्या तरी राजकीय पक्षाशी अधिकृत बांधिलकी पत्करून राजकीय पक्षात अधिकृत प्रवेश करावा, असा आग्रह शेकडो कार्यकर्त्यांनी धरल्याने आता प्रतिक देसाई यांच्या भूमिकेकडे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा या विभागातील कार्यकर्त्यांची व जनतेशी संपर्क असतो. आजपर्यंत श्री.देसाई यांनी निस्वार्थीपणे अनेकांना सक्षमपणे आधार दिला आहे. असे असताना आता प्रतिक देसाई यांनी आता कोणत्याही एका राजकीय पक्षाची बांधिलकी पत्करून राजकीय प्रवास निश्चित करावा, असा आग्रह शेकडो कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्यामुळे युवा नेते प्रतिक देसाई नेमक्या कोणत्या राजकीय पक्षात प्रवेश करतील याबाबत काही दिवसातच आपले भूमिका ते स्पष्ट करणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
आपल्याला असलेल्या जनाधराचा उपयोग पक्षाच्या ध्येय धोरणासाठी करण्यासाठी प्रतिक देसाई यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. मात्र नेमक्या कोणत्या पक्षात जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या पंधरा दिवसांत कोणत्यातरी एका पक्षाकडे आपली बांधिलकी जोडणार एवढे निश्चित मानले जात आहे. प्रतिक देसाई यांच्याकडे सर्व पक्षाचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते, सर्वच पक्षांचे नेते यांच्या गाठीभेटी चालू आहेत. आपल्याच पक्षात येण्याविषयी आग्रह धरला जात असल्याचे काही पक्षांतील नेत्यांचा आग्रह आहे. याआधी प्रतिक देसाई यांनी कोणत्याही प्रकारची राजकीय ठाम भूमिका स्पष्ट केली नव्हती. मात्र आता ते आपली राजकीय भूमिका कोणत्या पक्षाशी जोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे