(रत्नागिरी / वार्ताहर)
७६ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन युवासेना कॉलेज कक्ष रत्नागिरी तालुक्याच्यावतीने शहर आणि परिसरातील विविध महाविद्यालयात वृक्ष वाटप कार्यक्रम घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य कॉलेज कक्ष निरीक्षक अथर्व साळवी यांच्या पुढाकाराने तसेच युवासेना जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी, युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाद्वारे आणि कॉलेज कक्ष तालुका अधिकारी पारस साखरे यांच्या नियोजनाखाली हा वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी १०० वृक्षांचे वाटप करण्यात आले. गोगटे जोगळेकर महाविद्यालय ,विजु नाटेकर महाविद्यालय (पटवर्धन महाविद्यालय) नवनिर्माण महाविद्यालय, मत्स्य महाविद्यालय, फिनोलेक्स महाविद्यालय या सर्व कॉलेजच्या युवासेना युनिटने आपापल्या कॉलेजमध्ये वृक्ष वाटप केले.
यावेळी कॉलेज कक्ष उप तालुका प्रमुख नुपूर आचरेकर, उपशहर अधिकारी पारस पाटील ,अमन राणे, स्वराज साळुंखे, साहिल कांबळे, चिन्मय पोईपकर ,पवन भारती, विहान सुर्वे, इरफान मुल्ला, अरुण जोगी, टॉपिक अमीनगड, सिध्दांत बावदाने, पार्थ घाग, अथर्व उत्तुरे, अनिरुद्ध भाताडे, सारथी भाटकर, दर्शन आग्रे, कुणाल बने, सिमरन चव्हाण, मैथिली सोनावणे, शिवानी पवार, आर्य घवाळी, प्रणय बंदरकर, रितेश देसाई, अभिषेक गोराळे, अथर्व नागवेकर, स्मिथ चव्हाण, तन्वी मेधेकर, सिद्धेश कांबळी, गौरव तौसाळकर, अथर्व शिंदे, संतोष तेली, वैष्णवी उज्जल, स्पृती तोडणकर, रोशनी धूल, सानिका उलधरे, माधुरी वरघडे, भूषण शिंगटे, नीरज मचकर, पूर्वा पवार, शिवानी चव्हाण, ख़शी चव्हाण, अनिकेत जाधव, शुभम कोतवडेकर, आराध्य कदम, अर्णव पोळ, ऋषिकेश चव्हाण, अय्यान झारी, विक्सार देसाई,अथर्व खेडेकर, अनिरुद्ध शारंगधर, रोहित टोणपे संग्राम एडके, तुषार भनगडे,आकाश, सिनकर, स्वप्नील परब आदी उपस्थित होते.