(रत्नागिरी)
हिंदूहदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, तसेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करतानाच युवासेना तालुका प्रमुख प्रसाद सावंत यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होवून आज अनेक युवतींनी युवासेनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रसाद सावंत यांनी शिवबंधन बांधून आणि भगवा हाती देवून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतरही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रामुख्याने युवासेनेेने जोरदार मुसंडी मारत विरोधकांना जोरदार चपराक दिली आहे.
यावेळी उपशहर प्रमुख पारस पाटील, फिनोलेक्स कॉलेज युनिट अध्यक्ष सानिका साळवी उपस्थित होते. आमदार उपनेते राजन साळवी यांच्यासह युवासेना जिल्हा प्रमुख विनय गांगण, उपजिल्हा प्रमुख हेमंत खातू, जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.