(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माज़ी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम त्याचबरोबर दापोली विधानसभा युवा आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वात रत्नागिरी ज़िल्हा युवा अधिकारी पदी चेतनजीं सातोपे तसेच युवा सेना खेड तालुक़ा अधिकारी पदी सुरज संजय रेवणे यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली असता प्रथम खेड तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी सभा खेड येथे ज़िल्हा परिषद रेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत युवा ज़िल्हा अधिकारी चेतन सातोपे आणि तालुक़ा अधिकारी सुरज रेवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पड़ली.
सदर सभेत पक्ष बांधणी आणि रोज़गार विषयी प्रामुख्याने चर्चा होऊन एकमताने दापोली विधानसभा युवा आमदार यांच्या नेतृत्वात युवा सेना खेड मोठया उत्साहात काम करेल आणि तळागाळात शिवसेना युवासेना वाढविण्यासाठी काम अतिशय प्रामाणिकपणे होईल असे एकमुखी ठरविण्यात आले. सदर सभेस उपतालुका अधिकारी खेड विक्रांत साने, सौरभ चालके, वाहिद ममतूले, खेड शहर अधिकारी सिद्धेश खेड़ेकर, विभाग अधिकारी प्रणय ननावरे, साहिल मोरे, स्वप्निल सर्वे, तसेच विनोद खांबे, स्मितेश उतेकर, मंदार महाडीक, कौशल चिखले, कुंतल चिखले, रंजित सावंत, प्रथमेश शिंदे, विशाल पवार, रोहित यादव, फ़ैज़ान सुर्वे, विक्रम शिंदे, मेघराज आंब्रे, सनी चिकने, वेदांत तुंबारे,आमिर कुडुपकर, प्रतीक पोतनिस आदि पदाधिकारी युवासैनिक मोठया संख्येने उपास्थित होते.