(रत्नागिरी)
अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महविद्यालय आणि गोगटे जोगळेकर वरिष्ठ महाविद्यालय तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय रत्नागिरी येथे युवासेना कॉलेज युनिटचे उद्घाटन शिवसेना उपनेते आणि आमदार राजन साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. युवासेना जिल्हा युवा अधिकारी विनय गांगण, जिल्हा समन्वयक दुर्गेश साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी मर्गर्दशन करताना राजन साळवी म्हणाले की, भविष्यात आपणास ज्या काही अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उच्चशिक्षण घेवून आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार करा असे सांगताना आपल्या सारख्या उच्चशिक्षित युवकांची आज राजकारणात गरज असून आपण ही पोकळी नक्कीच भरून काढाल अशी अपेक्षा व्यक्त करताना, नवनियुक्त पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दुर्गेश साळवी, प्रसाद सावंत यांच्यासह उप तालुका युवधिकारी देवेंद्र अडके, शहर युवाअधिकारी आशिष चव्हाण, उप शहर युवधिकारी पारस पाटील, दीक्षांत मयेकर, खेडशी उपविभाग अधिकारी रोहित पिंपळे आदी उपस्थित होते.
अध्यक्ष: तरुण शिवलकर (कनिष्ठ महविद्यालय), स्वराज साळुंखे (वरीष्ठ महाविद्यालय), उपाध्यक्ष: शार्दुल गावणकर (कनिष्ठ महविद्यालय), साहिल कांबळे (वरिष्ठ महाविद्यालय), सचिव: अय्यान झारी (कनिष्ठ महविद्यालय), जयदीप सावंत (वरिष्ठ महाविद्यालय), सहसचिव: हितेश बिर्जे (कनिष्ठ महविद्यालय), रोहित शिंदे ( वरिष्ठ महाविद्यालय). सदस्य: ओम् सावंत, हृषिकेश ठाकूर, ओवेस वाघु, रेहान खलिफे, नितीन खोदिया, अमन खोदिया, अमन राणे, अजिंक्य कांबळी, अनुराग राणे, सोहम निवळकर, आयुष मोहिते, गुरुप्रसाद कोतवडेकर.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय
अध्यक्ष: बालाजी कसबे, उपाध्यक्ष: प्रसाद बंडबे, योगेंद्र जोईल, सचिव: इब्राहिम अन्सारी, सह सचिव: तेजस महाडिक
सदस्य: अथर्व गांगण, सोहम साळवी, कानिफ आंब्रे, जय परब, तरंग मांडवकर, हर्ष शेट्ये, प्रणित सुर्वे, वेदांत गोखले, अथर्व बने, ललित बंदरकर, अथर्व सुर्वे, नरेंद्र महाडिक, चिन्मय सावंतदेसाई, स्वयम् नागवेकर, इंद्रनील जुवेकर, जुनेद शेख, अमन हूनेरकर,आदिल म्हसकर, सचिन मेठा, स्वयम् शिंदे, सुशांत नागवेकर, परशुराम बरगुलकर, रूणाल सावंत, नरेश राठोड, ओम् माने.