यूट्यूबरला पैसे त्याने त्याच्या युट्यूब चॅनेल वर टाकलेल्या व्हिडिओमधून ज्या काही जाहिराती दिसतात, त्याचे पैसे मिळतात.
*आता हे पैसे किती मिळतात..?*
युट्यूबला जर एक जाहिरातीचे १०० रु. मिळाले तर ते त्यातील ४५% भाग स्वत: ठेवतात. आणि बाकिचे ५५% भाग यूट्यूबरला किंवा युट्यूब चॅनेलला देतात. जेवढे जास्त व्ह्यूज तेवढे जास्त पैसे.यूट्यूबरला किंवा युट्यूब चॅनेलला व्ह्यूजचे पैसे मिळतात.
*व्हिडिओच्या लाईक, कमेंटमुळे काय होते..?*
व्हिडिओ लाईक, कमेंटमुळे मुळे व्हिडिओ एंगेजमेंट वाढते. परिणामी व्हिडिओचे व्ह्यूज वाढण्यास मदत होते.आणि व्ह्यूज वाढले की जास्त जाहिराती दाखवल्या जातात आणि जास्त पैसे मिळतात.
*यूट्यूबरला यूट्यूबवरून पैसे कमावण्यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतात, त्या अशा आहेत अटी!*
एक युट्यूब चॅनेल चालु करावा लागतो.
त्या चॅनेलला १००० लोकांनी सबस्क्राईबर करायला हवं.
त्या चॅनेलवर ४००० तास वाॅच टाईम पूर्ण झालेला असावा.(watch time means the total of hours for which all of your videos are watched)
१००० सबस्क्राईबर आणि ४००० तास वाॅच टाईम हे युट्यूबने ठरवून दिलेल्या वर्षात पूर्ण झालेल हवेत.
त्यानंतर युट्यूबर युट्यूबकडे Monetization साठी ई-मेल द्वारे अर्ज करु शकतो.
चॅनेलला Monetization द्यायचं का नाही हे युट्यूब स्वत: ठरवणे आणि सर्व अटी नियम पूर्ण होत असतील तर Monetization साठी सहमती दर्शविली जाते.