स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तब्बल ८ हजार १६९ पदांच्या भरतीसाठी जाहीरात काढली आहे. याबाबतचे संपूर्ण अपडेट्स लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२३ मध्ये ही मेगा भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मधून अंदाजे ८१६९ जागा भरणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.यात प्रामुख्याने मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाच्या महाराष्ट्रातील विविध कार्यालयात लिपिक टंकलेखनाच्या 7034 जागा या भरल्या जाणार आहेत. गृह आणि वित्त विभागातही नोकर भरती केली जाणार आहे.
महाराष्ट्र राजपत्रित गट ब आणि क साठी संयुक्त ३० एप्रिल २०२३ रोजी होणार आहे. राज्यातील ३७ जिल्ह्यात केंद्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. याशिवाय अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २ सप्टेंबर २०२३ रोजी आणि क गट सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ९ सप्टेंबर २०२३ रोजी होणार आहे.