(रत्नागिरी)
विद्यमान वर्षाच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडणुकीमध्ये यश सुर्वेला 22 मते मिळून सचिव म्हणून निवडून आला. प्रतिस्पर्धी तुषार यादव याला 13 मते मिळाली. यश सुर्वे सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. तूषार यादव TYBA चा विद्यार्थी प्रतिनिधी आहे.
हे विदयार्थी मंडळ स्थानिक पातळीवर निवडणूक घेऊन निवडण्यात आले. येणाऱ्या वर्षभरात झेप महोत्सव त्याचबरोबर महाविद्यालयाच्या विकासामध्ये सक्रिय काम करणार आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून डॉ. आनंद आंबेकर व डॉ.सीमा कदम यांनी काम पाहिले, तर सहकारी म्हणून प्रा.अंकित सुर्वे यांनी काम केले. श्री प्रसाद (बापू) गवाणकर यांनी विशेष सहकार्य केले. निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ. मकरंद साखळकर आणि डॉ. चित्रा गोस्वावी यांनी काम केले. प्राचार्य डॉ प्रफुल्लदत्त कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यश सुर्वे गोगटे जोगळेकर महाविद्यालय सांस्कृतिक विभाग मुंबई विद्यापीठ युथ फेस्टिवलमध्ये विदयार्थी प्रतिनिधी म्हणून यशस्वी नेतृत्व केले आहे. मराठी विज्ञान परिषद गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी यासाठी काम केलं एकांकिकांमध्ये सहभाग, महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मॅनेजमेंट टीममध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या व्यावसायिक नाटकाची रंगमंच व्यवस्था, नॅशनल अवॉर्ड विजेत्या शॉर्ट फिल्म ‘हिरो’ मध्ये सुध्दा त्याचा सहभाग होता.
यश सुर्वेच्या निवडीबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगिकर, संचालक श्री मनोज पाटणकर प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी, विज्ञान शाखेचे उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी निवडणुक अधिकारी डॉ.आनंद आंबेकर, डॉ.सीमा कदम, प्रा.अंकित सुर्वे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा अभिनंदन केले आहे.