( चिपळूण /ओंकार रेळेकर )
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अश्या विविध क्षेत्रात श्री.साहिल प्रदीप आरेकर हे उत्तम काम करत आहेत. तसेच संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची आणि त्यांच्या संस्थात्मक कामाच्या अनुभवाची दखल घेऊन आमदार श्री.शेखर निकम यांनी श्री. साहिल आरेकर यांची यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई , जिल्हा केंद्र रत्नागिरी संस्थेच्या कामासाठी शिफारस करून त्यांची केंद्राच्या युवा समन्वय पदी निवड केली आहे आमदार निकम यांचे निकटवर्तीय अशी श्री.साहिल आरेकर यांची विशेष ओळख आहे
श्री.साहिल आरेकर यांना कुटुंबातच सामाजिक राजकीय वारसा लाभला आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, व गुहागर चे माजी सभापती स्व.सदानंद आरेकर यांचे ते नातू आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर चे जेष्ठ नेते श्री. पद्माकर आरेकर यांचे ते पुतणे आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटर मुबंई संस्थेचे अध्यक्ष देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार श्री.शरद पवार आहेत. तर खासदार सौ.सुप्रियाताई सुळे कार्याध्यक्ष आहेत. तसेच चिपळूण चे आमदार श्री.शेखर निकम या संस्थेचे जिल्हा केंद्र रत्नागिरीचे अध्यक्ष आहेत व अभिजित खानविलकर हे सचिव आहेत. श्री.साहिल आरेकर यांच्या निवडी मुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे