रायगड व रत्नागिरी या दोन्ह जिल्ह्यांना जोडणाऱ्या मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ आंबेत पुलाचे अंतीम टप्यात असलेले काम लवकरात लवकर मार्गी लागून पुल वाहतूकीकरिता खुला व्हावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरु केला असल्याची माहीती पार्टीची तालुका अध्यक्ष मुझ्झफर मुकादम यांनी पत्रकरांना दिली आहे.
खासदार सुनील तटकरे, राज्यमंत्री आदीती ताई तटकरे,दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा.आमदार श्री.संजयराव कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात पुलाचे मजुबतीकरणाचे कामास सुरुवात झाली असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मजबुतीकरणाचे काम अंतीम टप्यात असल्याचे माहीती मिळाली आहे. या पार्श्वभुमीवर पार्टीचे शिष्टमंडळाने बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेत पुलावर सुरु असलेल्या कामाची पहाणी सुध्दा केली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनही सादर करण्यात आले.
पुल वाहतूकीसाठी खुला करण्यासाठी सार्वजनीक बांधकाम खात्याने नियोजीत केलेल्या वेळेवरच तो सुरु व्हावा या कामात दिरंगाई करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाचे माध्यमातून करण्यात आले आहे.म्हाप्रळ आंबेत पुल सुरु होणे हा मंडणगड व तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय़ असलेले सध्या बाकी असलेले काम वेळेत पुर्ण न झाल्यास प्रसंगी आंदोलनाचा पवित्राही घेण्यात येईल अशी भुमीका पार्टीचेवतीने स्पष्ट करण्यात आली आहे. २७/५/२०२१ रोजी पुलाचे कामाची पहाणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे सचिव व माजी जि.प.सदस्य प्रकाश शिगवण,युवक अध्यक्ष लुकमान चिखलकर, मंडणगड नगरपंचायत मा.नगरसेवक श्री.सुभाष सापटे उपस्थित होते यावेळी सार्वजनीक बांधकाम अभियंता श्री.बामणे यांच्याकडे पुल नियोजीत वेळेत सुरु कऱण्याचे निवेदन सादर करण्यात आले.
नियोजीत वेळेतच वाहतुक सुरु करा- मुझ्झफर मुकादम पुलाचे काम पुर्ण झाल्याने वाहतूक लवकर सुरु होणार असल्याची माहीती पुढे येत असल्याने आवश्यक पाठपुरावा सुरु केला असून बांधकाम खात्याने नियोजीत वेळेपेक्षा अधिक विलंब करु नये मुंबई पुणे महानंगराकडे होणाऱ्या वाहतूकीसाठी पुलाचे कनेक्टव्हीटी अत्यंत महत्वाची आहे
या संदर्भातील जनभावना सर्वापर्यंत पोहचवण्याच आल्या असून या कामात दिरंगाई झाल्यास जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन कऱण्याची गरज भासली तरी कार्यकर्ते संघर्ष करतील.