(संगमेश्वर/दादा जाधव)
संगमेश्वर तालुक्यात प्रथमच म्यानमार देशातून भंते डॉ.संदामुनी महाथेरो त्यांच्या संघासोबत देवरुख येथे उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील धम्म चळवळीच्या दृष्टीने भन्तेजींची ही भेट महत्वमहत्वाची मानली जात आहे.
आज बुधवार दिनांक 29/06/2022 सकाळी 10 वा. देवरूख येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा इथे भेट देऊन त्यानंतर ते युवा समाजसेवक रोहित तांबे यांच्याकडून होणाऱ्या धम्मभोजनास 11 वाजता संगमेश्वर येथे उपस्थित रहातील. भोजना ग्रहणानंतर तेथेच धम्मदेसना आयोजित करण्यात आली आहे. धम्मदेसना तसेच त्यांच्या स्वागताला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन युवा समाज सेवक रोहित तांबे यांनी केले आहे .
मंगळवारी त्यांनी रत्नागिरीत ऐतिहासिक थिबा राजवाडा, करबुडे येथील नवगाव दिक्षा स्तंभ व बुद्ध विहार तसेच गडनरळ येथे भेट दिली. आज देवरूख येथील दौऱ्यानंतर ते कोल्हापुरहून औरंगाबाद येथे रवाना होणार आहेत. अधिक महितीसाठी तांबे रोहित यांना 9403011788 येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.