अल्ट न्यूजचे को- फाऊंडर आणि फॅक्ट चेकर मोहम्मद जुबेर यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. जुबैर यांच्यावरील सहाही गुन्ह्यांमध्ये हा अंतरिम जामीन देण्यात आला आहे. सोबतच जुबेर यांची तत्काळ सुटका करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.
दिल्ली न्यायालयाने मोहम्मद जुबेर यांना जामीन मंजूर केल्यानंतर उत्तर प्रदेशातील ५ जिल्ह्यांत ठिकाणी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते.