तेजा मुळ्ये, रत्नागिरी
विविध रंग आणि इतक्या सहज बदलणाऱ्या लहरी वाटणाऱ्या छटा .कोणत्याही लहानमुलाच्या डोक्याला जरा तिरक्या बाजूने पिस धरलं तर ते मूल कृष्ण होऊन जातं. इतका अनन्यभाव मोरपीस आणि कृष्णाचा. कदाचित कृष्णाच्या लहरी, नटखट, खोडकर, पण तितकाच मऊ, मुलायम ,स्वभाववैशिष्ट्यांमुळे तीच वैशिष्टय रंग आणि स्पर्शाने प्रतीत होण्यामुळे कृष्ण व मोरपीस जोडी असेल? माझ्या मनात याविषयी कुतूहल निर्माण झालं मग माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर विविध आख्यायिका समजल्या पण खूप पटून जाईल ,,,ठोस म्हणतो तसं उत्तर मला काही मिळालं नाही.
मोरपीस आणि त्याविषयीचा आत्म भाव प्रत्येकाचाच जपून ठेवण्याचा, हळुवार स्पर्श अनुभवण्याचा . प्रेम , कुतूहल, माया या तिघांचा मिलाफ म्हणजे मोरपीस,,,, मोर आणि लांडोर ही जोडी म्हणजे एकाशिवाय दुसऱ्याला अर्थ नाही एकमेकांना पूरक असणारे ,,,
आपण सर्वांनी अस एखादं तरी मोरपीस मिळवण्याचा आणि मिळालं ते जपून ठेवण्यासाठी पुस्तकात लपविल्याच घडलं असेल,, कधी हळुवार क्षणी मोरपीस गालावरून फिरणे म्हणजे काय हेही अनुभवलं असेल,,,वास्तू शास्त्रानुसार देखील याला काही महत्व आहे,,मला त्याचा अभ्यास नसल्याने मी त्याविषयी लिहिणार नाही,,, मोरपीस आपलं मन प्रसन्न करतं हे मात्र खरं,,म्हणूनच हा फोटो मला माझ्या मनाजवळचा वाटला. अस एखादं मोरपीस जुनी पुस्तकं चाळताना अलगद अंगावर पडावं तसं,,, हा मोरपिसांचा फोटो समोर आल्यावर झालं.
मनमोराला लाख पीसे,,,मोराला ही पाचुपिसे ।
भासती ती भावपिसे,,,,रंग ,लहरी ,खास दिसे ।