( नवी दिल्ली )
अॅपल कंपनीची माजी कर्मचा-यानेच २० मिलियन डॉलरला (१४० कोटी) फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अॅपल कंपनीला कोट्यवधींचा गंडा घातल्या प्रकरणी भारतीय वंशाच्या धीरेंद्र प्रसाद याला दोषी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणी धीरेंद्र याला २० वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. धीरेंद्र याने अॅपल कंपनीसोबत जवळपास १० वर्षे काम केले आहे. धीरेंद्र याने २०१८ पर्यंत कंपनीला १४० कोटींचा चुना लावल्याचा आरोप केला गेला आहे. त्याने २००८ ते २०१८ या कालावधीत अॅपल कंपनीसोबत ग्लोबल सर्व्हिस सप्लाय डिपार्टमेंटमध्ये बायर म्हणून काम केले आहे. २०११ पासून धीरेंद्रने कंपनीत घोटाळा करायला सुरुवात केली होती. यातून अॅपल कंपनीची १७ मिलियन डॉलर म्हणजेच १४० कोटी रुपयांचे नुकसान केले असल्याचा कंपनीचा दावा आहे.
धीरेंद्र याने कॅलिफोर्निया स्थापित अॅपल कंपनीला १४० कोटी रुपयांचा चूना लावला आहे. विशेष म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या करामती करत कंपनीला चुना लावल्याचे समोर आले आहे. भ्रष्टाचार करणे, चलन वाढवणे, अॅपलला कधीही न घेतलेल्या सर्व्हिससाठी पैसे घेणे यासारखी अनेक कामे करत धीरेंद्रने पैसे जमा केले होते.
धीरेंद्र प्रसाद यांचा निर्णय कोर्टाने मार्चपर्यंत राखून ठेवला आहे. मार्चमध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे स्थानिक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. धीरेंद्र याला मेलमधून फसवणूक आणि वायर फसवणूक करण्याच्या कटामध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. अमेरिकन सरकारने धीरेंद्र प्रसाद याची पाच मिलियन डॉलरपेक्षा अधिक संपती जप्त केली आहे. एका लेखी याचिकेत ५२ वर्षीय प्रसादने गुन्ह्याची कबूली दिली आहे.