कानपूरच्या बिल्हौरमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. अरौल येथील कोठी घाटावर गंगेत आंघोळ करताना सहा जणांचा बुडून मृत्यू झाला असून त्यामध्ये एक तरुण आणि पाच अल्पवयीन मुली गंगेत बुडाल्या आहेत.
यावेळी नातेवाईकांसह मुले गंगा नदीत आंघोळीसाठी गेली असता ही दुर्घटना घडली. यामध्ये अनुष्का उर्फ दिव्या कुमार, बहीण अंशिका, मुलगा राम सिंह, फारुखाबादमधील रामबाबू, तनुष्का, अनुष्का, सृष्टी आणि गौरी यांच्यासह आठ ते दहा जण आंघोळीसाठी कोठी घाटावर गेले होते. यावेळी यातील सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बुडालेल्यांचा शोध सुरू केला आहे.