एका तरुणाने आपल्या मैत्रिणीची ओढणी घेऊन तिच्या समोरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात सिंहगड पायथा परीसरातील एका हॉटेलमध्ये प्रेमसंबंधातील वादातून एका तरुणाने मैत्रिणीची ओढणी घेऊन तिच्या समोरच हॉटेलमधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी संध्याकाळी गोळेवाडा ठिकाणी घडली.
साकीब लतीफ इनामदार (वय २५, माऊली नगर, दिघी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचे आणि त्याच्या प्रेयसीचे गेल्या ३ वर्षांपासून प्रेमसंबध होते. मात्र, त्या तरुणीचे लग्न ठरले होते. ही तरुणी दुसऱ्या धर्मातील आहे. मात्र, तिचे लग्न जमल्याने त्या दोघांचे लग्न होऊ शकत नव्हते.
दरम्यान, ते रविवारी सकाळी अकराच्या सुमारास गोळेवाडी येथे किनारा लॉजवर आले. साकीब ने तरुणीला लग्नाचा आग्रह केला. मात्र, तिने तिचे लग्न ठरले असल्याचे संगात हे शक्य नसल्याचे देखील सांगितले. यावरुन दोघांचे वाद झाले. दरम्यान साकीब ने तिची ओढणी घेत तुझे आता लग्न ठरले आहे असे म्हणत आता मी जगून काय करू, असे म्हणत तिच्या समोर त्याने हॉटेल मधील पंख्याला तिची ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली.
घाबरलेल्या तरुणीने या घटनेची माहिती हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना दिली. तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना कळताच हॉटेल मालकाने पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.