(नवी दिल्ली)
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता भारताचे नवे लष्करप्रमुख असणार आहेत. काल याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मूळचे नागपूरचे असणारे मनोज पांडे हे 29 वे लष्करप्रमुख होणार असून ते या पदावर पोहोचणारे पहिले अभियंता आहेत. आतापर्यंत फक्त इन्फंट्री, आर्मर्ड आणि आर्टिलरी अधिकाऱ्यांनीच लष्करप्रमुख पद भूषवलं होतं. मात्र आता पहिल्यांदाच एक इंजिनिअर असलेला अधिकारी लष्करप्रमुख होणार आहे.