(दापोली)
पोलीस स्थानकात तक्रार दिल्याच्या रागातून मुलानेच बापाला दारु पिवून फलकाटाने मारहाण केल्याची घटना 10 एप्रिल रोजी दापोलीत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिश्चंद्र गणवे (75,विसापूर, दापोली) घरातील देवांची पूजा करत असताना त्यांचा मुलगा अशोक गणवे याने दारु पिवून ‘माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात एन.सी. केली काय? असे म्हणत बापाला फलकाटाने पाठीवर, पायावर मानेवर फटके मारुन दुखापत केली. मुलाच्या तावडीतून सोडवण्यासाठी घराच्या बाहेर पळाले त्यांच्या मागून धावत जात मारहाण केली.
याबाबतची फिर्याद हरिश्चंद्र गणवे यांनी दाखल केल्यानंंतर पोलिसांनी मुलगा अशोक गणवे याच्याविरोधात भादविकलम 324, 352, 305, 306 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्य पोलीस फौजदार चव्हाण करत आहेत.