(दापोली)
दापोली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनान्यावर बांधण्यात आलेली आणि कित्येक वर्षे धोकादायक झालेली चेंजिंग रूम जमीनदोस्त झाली आहे. तर स्वच्छतागृह मात्र अजून धोकादायक स्थितीतच उभे आहे.
पर्यटकांना समुद्राच्या पाण्यातून बाहेर आल्यानंतर कपडे बदलता यावेत यासाठी मुरूड समुद्रकिनाऱ्यावर चेजिंगरूम तसेच स्वच्छता गृहाची उभारणी करण्यात आली होती. मात्र पहिल्याच पावसात या इमारती खचून धोकादायक झाल्या होत्या. ही परिस्थिती गेली अनेक वर्षे होती.
याकामी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला होता तो आता वाया गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पहिल्याच पावसात अर्थात समुद्राच्या उधाणाच्या भरतीने हे बांधकाम उद्घाटनाआधीच खराब झाले होते. त्यानंतर ते वापरण्यासाठी धोकादायकही झाले होते, हे बांधकाम पाडून टाकण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने सार्वजनिक होण्याच्या मार्गावर आहे. बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता मात्र तरीही अनेक वर्षे हे बांधकाम पाडण्यात आलेले नाही.
यावर्षी समुद्रात आलेल्या उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या तडाख्याने येथील चेजिंग रूम जमीनदोस्त झाली आहे, तर स्वच्छतागृह मात्र जमीनदोस्त आहे. धोकादायक बांधकाम काढून काम ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग करू शकले नाहीत ते काम समुद्राने म्हणजेच निसर्गाने केले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.