( चिपळूण / ओंकार रेळेकर्)
स्पर्धेत मुचरी गावातील तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात दत्त जयंती निमित्त येथील मंडळाने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेतून राज्य पातळीवर खेळणारे खेळाडू घडतील येथील तरुणांना क्रीडा, शैक्षणिक तसेच सर्वच क्षेत्रात आपले नेहमी सहकार्य राहील असे प्रतिपादन चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केले.
तालुक्यातील मुचरी गवळवाडी येथे तरुण उत्कर्ष मंडळ मुचरी यांनी दत्त जयंती निमित्त गावातील भव्य मैदानात मंडळाच्या स्थानिक शाखा आणि मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने पंचक्रोशी निमंत्रित भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे या स्पर्धेचे उदघाटन सोमवार दि.४ डिसेंबर रोजी रात्री ८ वा करण्यात आले. या स्पर्धेला मुख्य मान्यवर म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित होते. आ.शेखर निकम, उद्योजक चंद्रकांत भोजने, माजी नगरसेवक भरत गांगण, माजी नगरसेवक रमेश खळे, दत्ताशेठ वळुंज, अजय भालेकर, तरुण उत्कर्ष मंडळ अध्यक्ष विनोद मिरगल , बाबुराव भालेकर, आदी मान्यवर या स्पर्धेला व्यासपीठावर उपस्थित होते.या वेळी आ.निकम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कबड्डीपटूंना प्रोत्साहित केले आणि तरुण उत्कर्ष मंडळ गवळवाडी मंडळाचे कौतुक केले.कबड्डी स्पर्धेचे उदघाटन आ.शेखर निकम यांच्या हस्ते फित कापून झाले. उद्योजक चंद्रकांत भोजने यांच्या हस्ते मैदानात श्रीफळ वाढवुन मैदानाचा शुभारंभ करण्यात आला. तर माजी नगरसेवक भरत गांगण यांच्या हस्ते टॉस उडवून स्पर्धेला सुरुवात झाली, कोकणातील प्रतिष्ठित उद्योगपती, एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे चंद्रकांत भोजने यांनी आपल्या भाषणातून कबड्डीपटूंना शुभेच्छा देऊन गावच्या विकास कामात सामाजिक कार्यात आपला नेहमी हातभार असेल असे आश्वासन दिले.गोविंद भोजने, सुरेश टोपरे, शांताराम कांबळे, प्रभाकर भोजने, शांताराम टोपरे. जी .झेड टोपरे,सुनील महाडिक,समीर गवळी, मंदार महाडिक, विनोद मिरगल यांसह मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय कांबळे यांनी केले.यूपीएसी मध्ये नुकतेच उत्तीर्ण झालेले आयपीएस अधिकारी चेतन पंदेरे बुधवार दि. ७ डिसेंबर रोजी सायंकाळी गांवातील मुलांना मार्गदर्शन करणार आहेत तरी गावातील सर्व बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाच्या वतीने संजय कांबळे यांनी केले आहे.