( रत्नागिरी )
शिक्षकांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. त्यासाठी शिक्षकांनी मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभेचा ठरावही देणे अत्यावश्यक आहे. मात्र मुख्यालयी राहत असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव न देणाऱ्या शिक्षकांचे घरभाडे रोखण्याची कारवाई जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना जिल्ह्यातील नऊही गटशिक्षणाधिकाऱ्यांना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही शहराच्या ठिकाणावरुन ते ये-जा करत असतात. त्यामुळे कार्यालयीन काम करुन. गावामध्ये सामाजिकरित्या एकरुप होऊन उर्वरित वेळेमध्ये गावातील परिस्थितीचा आढावा व गावातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. मात्र दळणवळणाची सोय असल्याने बहुतांश शिक्षक हे शहराच्या ठिकाणीच राहत आहे.