(नवी दिल्ली)
राज्यातील घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींमध्ये भाजपचा मोठा हात होता हे सिद्ध झाले आहे. नुकतेच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर शुक्रवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मोठी फूट पडून नव्याने सरकार स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा होता. तसेच, सत्ता नाट्यानंतर मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे, तर उपमुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले आहे. या बदलात केंद्र सरकारने मोठी मदत केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाचा दिल्ली दौरा होता. यावेळी, अमित शहा यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल, असे मला आश्वस्त केले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट केले आहे.