(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह जनक वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठवले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीपूरता हा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. मात्र यावरूनच चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.
शिंदे गटाने केलेल्या आरोपानुसार, ‘आनंद दिघे असते तर त्यांनी शिंदेंना उलटे टांगले असते’ असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. याविरोधातच आता शिंदे गटाकडून खैरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.