सिंधुदुर्गमध्ये अद्यापही सुरू न झालेल्या चिपी विमानतळावर मुख्यमंत्री तीन तासांच्या “हाॅलिडे” पॅकेजसाठी आले होते. त्यांनी आजच्या दौऱ्यात सिंधुदुर्गवरच नव्हे तर अवघ्या कोकणावर अन्याय केला आहे. त्यांचा आजचा दौरा म्हणजे “लिपस्टिक” दौरा होता. त्याचा काही फायदा नाही, असा आरोप आमदार तथा भाजपचे नेते नितेश राणे यांनी केला.
या दौ-यात त्यांनी कोणाची दु:ख जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट माजी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी तीन दिवसांचा दौरा करीत लोकनेता कसा असतो हे दाखवून दिले, तर उध्दव ठाकरे अभिनेत्या सारखे फिरून गेले, म्हणून भाजपच्या माध्यमातून आम्ही त्यांचा निषेध करतो असेही म्हणाले.