(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीने मोठे आरोप केले आहेत. हा आरोप करताना त्यांनी एक फोटो जारी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून राज्य चालवत आहेत, असा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला आहे. याबाबत एक फोटो राष्ट्रवादीचे पदाधिकारी रविकांत वरपे यांनी ट्विट केला आहे.
मुख्यमंत्री दिल्लीत गेल्यामुळे त्यांनी जबाबदारी त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांना दिली आहे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. आपल्या चिरंजीवांना सरकार चालवण्यासाठी पुढे केलं आहे का, असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे. आता यावर काँग्रेसने देखील टीका केली आहे.
“मुख्यमंत्री शिंदे, पण कारभार करतायत फडणवीस आणि खुर्चीवर बसलेत चिरंजीव” अरे ते मुख्यमंत्री पद आहे की संगीत खुर्ची?, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसने केली आहे.
दरम्यान, सत्ताधारी शिंदे गटाकडून आरोपानंतर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. जो फोटो व्हायरल होत आहे. तो माझ्या कार्यालयातील आहे. यापाठीमागे कोणताही हेतू नाही. अनावधानाने ‘मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन’ हा फलक येथे आहे, असा फलक ठेवण्यामागचा कोणताही उद्देश नाही, असं स्पष्टीकरण श्रीकांत शिंदेंनी दिलं आहे.