(देवरुख/ प्रतिनिधी)
आपल्या देशाचे, महाराष्ट्र राज्याचे भविध विद्यार्थीच्या हाती आहे हाच केंद्रबिंदू मानून महाराष्ट्र शासनाने शिक्षण क्षेत्रात नव नवीन उपक्रम हाती घेतले आहेत त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर योजने अंतर्गत मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियान राज्यात सर्वत्र राबविले जात आहे. या अभियानात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग नोंदवत जिल्हात हे अभियान यशस्वी करावे यासाठी संगमेश्वर तालुक्यात कार्यशाळाचे आयोजन देवरूख जि. प. शाळा नं. ४ मध्ये करण्यात आले होते.
या कार्यशाळेसाठी रत्नागिरी जि. प. च्या उपशिक्षणाधिकारी शिरमाने मॅडम, विस्तार अधिकारी सरोज आखाडे. केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यातील सर्व शाळंनी या मोहिमेंतर्गत होणाऱ्या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभगी हावे असे आवाहन जि.प.उप शिक्षणाधिकारी शिरमाने मँडम यांनी केले.
शासनाच्या आदर्श शाळेसाठी असणाऱ्या योजनांची माहिती उपशिक्षणाधिकारी यांनी देत प्रत्येकाने आपल्या शाळेला आणखी आदर्श कशी करता येईल यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. शाळेची प्रगती हि शिक्षकांसह मुलांच्या प्रगतीवर चालते, म्हणून विद्यार्थ्यांना लहानपणीच योग्य मार्गदर्शन केले तर ती मुले भविष्यात योग्य मार्गाने वाटचाल करतात व यश संपादन करून देशाचे व राज्याचे नाव उज्ज्वल करून विकासात हातभार लावतील असे सांगून त्यांनी शिक्षकांना काही महत्वाच्या सूचना ही केल्या.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या संदेशाचे वाचन सर्व शाळांमध्ये करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले.