( चिपळूण )
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान राबविण्यात येणाऱ्या”मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानांतर्गत आरोग्य व स्वच्छतेचे महत्व या उपक्रमांतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनी कॉलेज खेर्डी चिंचघरी सती विद्यालयात शनिवार दि.20/1/2024 रोजी विद्यालयातील किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व आत्मसन्मान यासाठी मासिकपाळी दरम्यान स्वच्छता आणि आरोग्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आहे.
विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सौ.सुलोचना जगताप यांनी विद्यार्थिनींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीमध्ये जननेंद्रियांची स्वच्छता, आपल्या शरीराला मासिक पाळी दरम्यान कोणत्या आहाराची गरज असते आणि मासिकपाळी दरम्यान असलेली उदासीनता, अनास्था, नकारात्मक मानसिकता, यामुळे होणारे मानसिक विकार, सॅनिटरी पॅड व त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला उपस्थित मुलींनी मनमोकळेपणाने आपल्या मनातील प्रश्न, शंका व मासिकपाळी विषयीच्या विटाळ, चुकीच्या रूढी, गैरसमज व घ्यावयाची काळजी, अनियमित मासिक पाळी याविषयी परखडपणे भाष्य केले व आपल्या शंकाचे निरसन करून घेतले.
या कार्यक्रमाला सहाय्यक शिक्षिका श्रीम पल्लवी शिंदे, श्रीम विनया धांगडे, सौ.कल्पना पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ सुलोचना जगताप व कु.शर्मिला म्हादे व आभार श्रीम.विनया धांगडे यांनी केले.