(नवी दिल्ली)
राजस्थानमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचा प्रचंड राजकीय गदारोळ सुरू असताना पक्षाचे नेते सचिन पायलट पक्षप्रमुख सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट यांनी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे,
सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींसोबत अद्याप बैठक निश्चित झाली नाही. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्यानंतर सचिन पायलट यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीला ९० हून अधिक आमदारांचा विरोध आहे. सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामे देण्याची धमकी दिली आहे. या व्यतिरिक्त अशोक गेहलोत हेदे खील दिल्लीत जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. राजस्थान काँग्रेसमधील गदारोळाबाबत पक्षाच्या निरीक्षकांनी मंगळवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना अहवाल सादर केला आहे. तसेच आमदारांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका निरीक्षकांनी ठेवला आहे.
महेश जोशी यांच्याशिवाय कॅबिनेट मंत्री शांती धारिवाल आणि आमदार धर्मेंद्र राठोड यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हे तिन्ही नेते मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय मानले जातात.