(मुंबई/किशोर गावडे)
भांडुप पश्चिमेच्या शिवछत्रपती शिवाजी तलावाची पाहणी काल पहाटे सव्वातीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याच्यासोबत माजी आमदार व विभाग प्रमुख अशोक पाटील व ईशान्य मुंबई महिला विभाग संघटिका राजश्री राजन मांदविलकर त्यांच्या सोबत होत्या. संपूर्ण तलावाची पाहणी करीत असताना पालिका प्रशासनाकडे सुशोभीकरण करण्याची वारंवार मागणी केली जात असल्याचे अशोक पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले.
गेली 25 वर्ष विक्रांत इंटरप्राईजेसच्या माध्यमातून अत्याधुनिक स्पिड बोटी व सुसज्ज तराफे लावून घरगुती गणपती, सार्वजनिक गणपती, गौरी विसर्जन या तलावात होते. गतवर्षी एकूण ३ बोटी, तसेच, १ रो बोट त्याचबरोबर २० जीवरक्षक जॅकेट तयार केल्याचे अशोक पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना सांगितले.
शिवाजी तलावाच्या विसर्जनाची उत्तम व्यवस्था, गणेश विसर्जनाच्या तलावाची पाहणी व आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विभागप्रमुख अशोक पाटील यांच्या कामाची प्रशंसा करून गेली 25 वर्षे विनामूल्य आपण श्री गणेशाची सेवा करत आहात. अत्याधुनिक व नाविन्यपूर्ण शिवाजी तलावाचा परिसरचे सुशोभीकरण करूया, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला व अशोक पाटील यांचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. मनपा आयुक्तांनी आता शिवाजी तलावाच्या सुशोभीकरणावर त्वरित निर्णय घेणे अपेक्षित आहे, असेही पाटील यांनी सांगितले.