(रत्नागिरी)
फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशन हे आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकास, जलसंधारण आणि स्वच्छता यासारख्या विविध क्षेत्रात काम करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील क्षयरुग्णांसाठी 203 पोषण रेशन किट्स दान करून ‘निक्षय मित्र’ बनून आरोग्यामध्ये आणखी एक मोलाचा दगड गाठला आहे. गुजरात वडोदरामध्ये ‘निक्षय मित्र’ बनून ८२ क्षयरुग्णांसाठी पोषण रेशन किट्स देऊन मुकुल माधव गुजरात वडोदरामध्ये ‘निक्षय मित्र’ बनून ८२ क्षयरुग्णांसाठी पोषण रेशन किट्स देऊन मुकुल माधव फाउंडेशनने काम चालू केले आहे.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 2025 पर्यंत भारत क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमानुसार जिल्हा क्षय अधिकारी रत्नागिरी यांचेकडून आवाहन प्राप्त झाले. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशने आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि रत्नागिरी जिल्ह्यातील 203 रुग्णांना पौष्टिक रेशन किट दानासाठी दत्तक घेतले. दि. ४ एप्रिल रोजी जिल्हा प्रशिक्षण केंद्र रत्नागिरी येथून वितरण मोहिमेला सुरुवात झाली. जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या निर्देशानुसार किटमध्ये मूग डाळ, चना, खजूर , तांदूळ, प्रथिने पावडरचे पॅकेट, खाद्यतेल असे स्वरूप आहे. पुढील 6 महिन्यांसाठी हे किट देण्यात येणार आहे.
डॉ. संघमित्रा फुले, सिव्हिल सर्जन रत्नागिरी, डॉ. अनिरुद्ध आठल्ये आरोग्य अधीकारी रत्नागिरी, डॉ. गावडे, अतिरिक्त आरोग्य अधीकारी, जिल्हा क्षय अधिकारी आणि THO रत्नागिरी, डॉ. सुरवंशीं , श्री चक्रवर्ती संचालक टेक्निकल फिनोलेक्स इंडस्ट्रीज रत्नागिरी आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाऊंडेशनची टीम उपस्थित होती.
या उदार देणगीबद्दल डॉ. संघमित्रा फुले, डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि डॉ. गावडे यांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या सौ. रितू प्रकाश छाब्रिया यांचे विशेष आभार मानले. या पौष्टिक रेशन किटमुळे क्षय (टीबी) रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढणार असून त्यामुळे ते लवकर बरे होतील. त्यांची कार्यक्षमता लवकर बरी होऊन ते काम सुरू करतील. ६ महिन्यांसाठी २०३ रुग्णांना दत्तक घेतल्याबद्दल अधिकारी आणि रुग्णांनी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनचे आभार मानले.