(मुंबई / किशोर गावडे)
भांडुप पश्चिम येथील पराग विद्यालयाच्या प्रांगणात माजी आमदार श्यामभाई सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुंबई शूटिंग बॉल असोसिएशनच्या मान्यतेने रविवारी शुटिंग बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई शूटिंगबाॅल असो.चे अध्यक्ष व माजी आमदार श्याम सावंत, यांच्या मार्गदर्शनाखाली नामांवत 18 संघांनी सहभाग घेतला होता. रविवारी सकाळी 9 वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत जयंत घोरपडे संघ टेंभुर्णी सोलापूर, या संघाने एमबीपीटी मुंबईचा 21–7 असा एकतर्फी विजय प्राप्त केला. टेंभुर्णी सोलापूर या संघाने पूर्वर्धात एमबीपीटी चे क्षेत्ररक्षण खिळखिळे केले होते. मात्र उत्तरार्धात खेळाडूंनी बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही.
टेंभुर्णी सोलापूर संघाला 7 हजार रुपये व आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर एम बी पी टी मुंबई संघाला 5 हजार रुपये आकर्षक ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. आरमार विक्रांत हा संघ तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. तर शासकीय दूध डेअरी पुणे हा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. या दोन्ही संघांना प्रत्येकी 3 हजार रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.
या स्पर्धेत एम .बी .पी .टी .या संघाचा भूषण मेस्त्री उत्कृष्ट खेळाडू ठरला तर सामनावीर म्हणून टेंभूर्णी संघांचा नाना चौगुले ठरले या दोन्ही खेळाडूंना आकर्षक सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.राजेश भाटिया व डॉ.वसंत दराडे यांनी केले. मुंबई शुटिंग बाॅल संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला माजी आमदार श्याम सावंत, माजी आमदार अशोक पाटील, पराग विद्यालयाचे संस्थापक संचालक बाळकृष्ण बने शेठ, मुंबई शूटिंग बाॅल संघटनेचे सेक्रेटरी दीपक सावंत, खजिनदार प्रफुल्ल वाईरकर, स्पर्धा नियंत्रक मुंबईचे माजी कर्णधार, उपाध्यक्ष रत्नदीप रावराणे, स्पर्धा निरीक्षक, पंच सहसचिव मिलिंद बिर्जे, पांडूरंग सुतार, चंद्रकांत नगरे, तिन्ही मुंबई, सुनील गायकवाड नवी मुंबई आदी मान्यवर उपस्थित होते.