(मुंबई)
केंद्रीय अन्वेषण ब्युरोने सोमवारी मुंबई विमानतळावर एकाला अटक करीत त्याच्याकडून ६ किलो हेरॉईन जप्त केले. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत १८ कोटी रुपये आहे. जसिंकी आंद्रेज विसाव असे या ड्रग तस्कराचे नाव असून ती पोलंड देशाचा नागरिक आहे.
जसिंक हा मुंबईहून झिम्बाब्वेमार्गे इथिओपियाला जात होता. सीबीआयला इंटरपोलकडून माहिती मिळाल्यानंतर त्याला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. आरोपीची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ जप्त करण्याची ही या महिन्यातील तिसरी घटना आहे.