(रत्नागिरी)
मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून पात्रता फेरीमध्ये मुंबईमध्ये झालेल्या अंतिम मेहंदी स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाची अनुष्का महाजन या विद्यार्थिनीला सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
वेडिंग मेहंदी हा विषय मेहंदीसाठी आला होता अकरा झोनमधून अंतिम फेरीत गेलेल्या मुंबई विद्यापीठातील सर्व स्पर्धांमध्ये अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत अनुष्का महाजन आपली पार्टनर अल्फा सोलकर हिला घेऊन स्पर्धेत उतरली होती. प्रा. आतीका राजवाडकर संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हलीमा पाटणकर हीचे सहकार्य प्राप्त झाले त्याचबरोबर मुंबईमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून यश सुर्वे यांनी जबाबदारी पार पाडली.
सदर निवडीसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर आनंद आंबेकर यांनी प्रमुख जबाबदारी पार पाडली. अनुष्का महाजनच्या सुवर्णपदकाबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रफुल्लदत्त कुलकर्णी, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. यास्मिन आवटे, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ.चित्रा गोस्वामी ,विज्ञान शाखेचे उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर यांनी अभिनंदन केले आहे. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी आणि पालक यांनी अभिनंदन केले आहे.