(रत्नागिरी)
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विभागीय वूमेन्स बॅडमिंटन स्पर्धा देवरुख येथील एपीएस महाविद्यालयामध्ये पार पडल्या. या स्पर्धेमध्ये नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाचा महिला संघ कोकण विभागात सर्वोत्कृष्ट ठरला.
या स्पर्धेमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून १३ महाविद्यालयानी सहभाग घेतला यावेळी एस पी हेगशेट्ये महाविद्यालय महिला संघाने देवरुख, पिल्लई आणि ज्ञानदीप खेड संघांना हरवत अंतीम फेरीत दाखल झाला. अंतीम फेरीत कुडाळ कॉलेज विरूद्ध जबरदस्त फटकेबाजी करत एस पी हेगशेट्ये महाविद्यालयातील श्रुती फनसे (कप्तान), सायली चव्हाण, मैथिली सावंत, आणि श्रावणी कांबळे यांच्या संघाने अव्वल स्थान पटकावले. श्रुती फनसे हिची निवड मुंबई विद्यापीठाच्या संघासाठी करण्यात आली.
संघाने घवघवीत यश मिळविल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ आशा जगदाळे, प्रा सुकुमार शिंदे, सुशील सावळी, अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या