(मुंबई)
प्रमुख रुग्णालये व विशेष रुग्णालये व सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत उपनगरीय रुग्णालये व प्रसुतीगृहांमधील रिक्त परिचारिकांच्या (नर्स) जागी नव्याने भरती करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या रिक्त ६५२ जागांसाठी महापालिकेच्यावतीने जाहिरात प्रकाशित केली असून त्यानुसार येत्या ८ ते २१ मार्च या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीमध्ये लेखी अर्ज मागवले आहेत.
मुंबई महापालिकेच्या केईएम, शीव, नायर आणि कूपर या चार प्रमुख रुग्णालयांसह १७ उपनगरीय रुग्णालय, विशेष रुग्णालय आणि प्रसूतिगृह आदी ठिकाणी परीचारिकांची पदे अनेक वर्षांपासून रिक्त होती. त्यामुळे रुग्णालयीन कामांमध्ये प्रचंड अडचणी निर्माण होत होती. त्यामुळे ही पदे भरण्यास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर याबाबतची जाहिरात प्रसिध्द करून इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. मुंबई महानगर पालिका आणि इतर मान्यता प्राप्त परिचर्या शाळेतून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून ही निवड करण्यात येणार आहे.
परिचारीकांची एकूण ६५२ पदे
- सर्वसाधारण गट : ३८४
- खेळाडू : २५
- प्रकल्पग्रस्त : २५
- भूकंपग्रस्त : ०८
- माजी सैनिक : ८४
- पदवीधर पदविकाधारक अंशकालिन : ५५
वेतनश्रेणी : ३५,४०० रुपये ते १ लाख १२ हजार ४०० रुपये
अर्ज पाठवण्याचा कालावधी : ८ मार्च ते २१ मार्च २०२३
अर्ज पाठवण्याचा पत्ता:
वैद्यकीय अधिक्षक यांचे कार्यालय, कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. ०७, (प्रशिक्षण / लेक्चर हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग, (ऑर्थर रोड), चिंचपोकळी (पश्चिम), मुंबई- ४०० ०११.
अर्ज स्वीकारण्याची वेळ : सकाळी ११ ते संध्या ५ वाजेपर्यंत( प्रत्येक शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून)
या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द :http://portal.mcgm.gov.in/ irj/portal/anonymous