(मुंबई)
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून आता एसटी महामंडळाच्या साध्या बसेस धावणार नाहीत. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरून फक्त शिवनेरी बस चालवण्यात येणार आहे. जमा आणि खर्च याचा मेळ बसत नसल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
एसटीच्या अनेक साध्या बसेस एक्स्प्रेसवेवरून जात असल्याने त्याचा मोठा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. प्रवासी भारमान कमी होणे आणि टोलचा भार असा दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत होता. त्यानंतर आता प्रशासनाला जाग आली आल्याने हा निर्णय घेण्यात आला.