(मुंबई)
कोकणवासीयांना सुविधाजनक ठरणारी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचं आज शनिवारी (३ जून) रोजी होणारा लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवणार होते. तर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे मडगाव रेल्वे स्टेशनवर उपस्थित राहणार होते. पण ओडिशामध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामुळे वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण रद्द करण्यात आलं आहे.
ओडिसाच्या बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
https://twitter.com/ANI/status/1664686864161177629?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1664686864161177629%7Ctwgr%5E17776f4a56d89e951deca8142337ce7853d08b10%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.hindustantimes.com%2Fmaharashtra%2Fmumbai-goa-vande-bharat-flag-off-cancelled-after-coromandel-express-accident-odisha-train-accident-141685731492558.html
मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा आज होणारा उद्घाटन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ओडिशामध्ये झालेल्या रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.’वंदे भारत एक्स्प्रेस’चा उद्घाटन कार्यक्रम मडगाव येथे पडणार होता. उद्या होणाऱ्या कार्यक्रमासाठीची तयारी पूर्ण झाली होती. मात्र,अपघातामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
#WATCH | Somyaranjan Sethy, one of the victims of the horrific train accident in Odisha's Balasore, narrates about the incident pic.twitter.com/n0MnuyB8s3
— ANI (@ANI) June 2, 2023