( महाड / प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गावरील दासगाव येथे ज्वालाग्राही रसायनाने भरलेला टँकर पलटी होऊन मोठा अपघात झाला. हा टँकर मुंबईहून महाड येथील एमआयडीकडे रसायन घेऊन जात होता. हा अपघात सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडला. दासगाव येथे हा रसायनाने भरलेला टँकर पलटी झाल्याने भीतीचे वातावरण होते. त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी रवाना झाले. महामार्गांच्या दोन्ही बाजूला २ किमी पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ज्वालाग्राही रसायन असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव टँकरवर पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु होते.
या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, लुपिन लिमिटेड , तारापूर एम आय डी सी मधून महाड एम आय डी सी मधील जेट इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्या साठी स्पेनट ऑरगॅनिक सोलव्हेन्ट घेऊन येणारा टँकर क्रमांक एम एच ०४ बी जी -८१३ हा आज सकाळी १० वाजता दासगाव गावाच्या हद्दीत एका वळणावर महामार्गावर पलटी झाला. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड पो.उप नी. प्रवीण धडे, सहा.फौ.गणेश भिलारे,पो.हव.नंदन निजामपूर कर, पो.ना. अजय मोहित,पो.शि सनील पाटील,आणि महाड शहर पोलीस यांनी घटना स्थळी धाव घेतली.
घटनेचे गांभीर्य पाहता महामार्गावरील वाहतूक त्वरित बंद करण्यात आली. महाड अद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल तसेच सेफटीचे मार्क कॉर्डिनेटर चंद्रकांत देशमुख,सेफटीचे शीतल पाटील,रोहन पाटील, यांना पाचारण करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत भरलेला टँकर सुरक्षित बाजूला करण्यात आला त्यानंतर सुमारे तीन तासाने वाहतूक सुरळीत करण्यात आली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित आणि झाली नाही.