( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली ते बावनदी दरम्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून वन विभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होऊनही वनविभाग मात्र निद्रिस्त असल्याचे दिसून येत आहे. याबाबत वन प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे एका ठेकेदार कंपनीकडून होत आहे. या कंपनी विरोधात अनेक तक्रारी आंदोलनेही करण्यात आली. मात्र ठेकेदारावर त्याचा काहीच परिणाम दिसून येत नाही. सध्या महामार्गावर तोडलेली वृक्ष गोवा, कर्नाटक, कोल्हापूर, सांगली, मिरज आदी ठिकाणी विकण्यासाठी जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे हे लाकूड विक्रीसाठी परवानगी ही मिळत आहे असे बोलले जात आहे. याबाबत वन प्रेमींनी विचारणा केले असून नाराजी व्यक्त केली आहे. ही वृक्षतोड होत असताना वन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असून वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या विनापरवाना लाकूडतोड आणि विक्री करणाऱ्यांवर त्वरित यावर कारवाई करण्यात यावी अशी वनप्रेमींनी मागणी केली आहे.