(रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई – गोवा महामार्गावर दारुचे सेवन करुन कंटेनर चालवणार्या चालकाला न्यायालयाने सोमवार 30 जानेवारी रोजी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना शुक्रवार 27 जानेवारी रोजी हातखंबा येथे घडली होती. रजनिशकुमार जयपाल रावत (27,रा. ता. चुरहाट जि.सिधी, मध्यप्रदेश) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात हातखंबा वाहतुक मदत केंद्रातील सहाय्यक पोलिस फौजदार मुरलीधर नाटेकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
शुक्रवारी रजनिशकुमार रावत आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच-43-बीजी-9712) घेउन मुंबई-गोवा महामार्गावरुन जात होता. त्यावेळी हातखंबा येथील पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो दारुच्या नशेत कंटेनर चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. सोमवारी रजनिशकुमारला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांनी 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.