( मुंबई )
कांदिवली क्रांतीनगर येथून निघालेल्या वातानुकूलित बेस्ट बसला गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग बस चालकाच्या केबिनमध्ये शार्ट सर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे. चालकाच्या केबिनमध्ये अचानक आग लागली.
ही आग भडकण्याआधीचं चालकाने तात्काळ बसचे दरवाजे उघडल्यामुळे बसमध्ये असलेले प्रवासी तात्काळ बाहेर पडले. सायंकाळी ६ च्या दरम्यान घडलेल्या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट उडाली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेवून आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.