(मुंबई)
मुंबईतील जुहू बीचवर पोहण्यासाठी गेलेले सहा जण आज समुद्रात बुडाले. यातील दोन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. तर, चार जण अजूनही बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. ही घटना सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी बचावकार्य करीत आहेत.
एएनआय वृत्तसंस्थेने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईच्या जुहू चौपाटीवर आज संध्याकाळी पोहताना ६ जण बुडाले. यातील २ जणांना स्थानिकांनी वाचवले असून उर्वरित चौघांना वाचवण्यात त्यांना अपयश आले. त्यांच्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे.