मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटात आज शनिवारी (१ जुलै २०२३) दुपारी सवातीनच्या सुमारास ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक केबिनमधून सुखरूप बाहेर आल्याचे घटनास्थळी पाहणी केल्यावर दिसून आले.
मुंबईच्या दिशेने मालवाहू ट्रक जात असताना निवळी घाटातील एका अवघड वळणावर ट्रक (एमएच 19 एए 8427) आला असता चालकाला वळणाचा अंदाज आला नाही त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता प्रत्यक्षदर्शनी ट्रक पाहिल्यावर समजून येते. मालवाहू ट्रक थेट विरुद्ध दिशेला जाऊन रेलिंग तोडून रस्त्याच्या बाजूस पलटी झाला. प्रत्यक्षदर्शनी ट्रकची अवस्था पाहिल्यावर पलटी झालेल्या ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येते.
या अपघाताबाबत हातखंबा वाहतूक पोलीसांना संपर्क केला असता त्यांना देखील सदर अपघाताची माहिती नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
Welcome...
https://ratnagiri24news.com
'रत्नागिरी 24 न्यूज' वेबपोर्टल रत्नागिरीकरांच आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. कोणतंही वैचारीक, आर्थिक वा राजकीय जोखड नसलेला हा सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र पत्रकारितेचा एक डिजिटल मिडीया प्लॅटफॉर्म आहे. आपल्या भागातील समस्या, घटना, बातम्या आमच्या 9527509806 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
- टीम 'रत्नागिरी 24 न्यूज'
This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy. I Agree
महानगरांसह जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडींसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हा. बातम्यांसोबत संग्राह्य माहितीचा खजानाही !