(मुंबई)
मीरा रोडमधील हत्याकांडात बळी गेलेल्या सरस्वती वैद्य हिच्या तीन सख्ख्या बहिणींनी शुक्रवारी उशिरा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी तिची ओळख पटवली आणि मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यांची डीएनए चाचणी सरस्वतीच्या डीएनएशी जुळतो का ते पाहिल्यानंतर पोलीस पुढील प्रक्रिया पार पाडणार आहेत. दरम्यान आरोपी मनोज साने आपला जबाब सतत बदलत आहे. आपण एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सरस्वती मला मुलीसारखी होती, असेही तो म्हणाला.
सरस्वती मनोजसोबत राहत असल्याची कल्पना तिच्या बहिणींना होती. त्या दोघांच्या वयात खूप अंतर असल्याने त्याला ती मामा मानते असे तिने नातेवाईकांना सांगितले होते, अशी माहिती बहिणींनी दिल्याचे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले. दरम्यान, मनोजने पोलीस चौकशीत म्हटले, ‘मी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे. मी सरस्वतीशी कधी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. सरस्वती ही माझ्या मुलीसारखी होती. तिने ३ जून रोजी आत्महत्या केली होती. माझ्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने मी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्वत:चे आयुष्यही संपवण्याचा प्लान केला होता. सरस्वती आणि मनोज यांनी रजिस्टर्ड लग्न केले नसले तरी मंदिरात लग्न केले होते. मात्र लग्नाची तारीख मला आठवत नाही’, अशी माहिती पोलिसांनी दिली.
५६ वर्षीय लिव्ह इन पार्टनर मनोज साने याने ३२ वर्षीय सरस्वती वैद्य या महिलेची हत्या केली. मात्र, या दोघांचं नेमकं नातं काय होतं?, या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली असता, पीडित आणि आरोपी हे विवाहित असल्याचे आम्हाला आढळून आले आहे. त्यांच्या विवाहपणाची बाब बहिणींना देखील माहिती होती. परंतु त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांनी हे इतरांपासून लपवले होते, अशी माहिती डीसीपी जयंत बजबळे यांनी दिली. दरम्यान, आरोपीने केलेल्या दाव्यानुसार आणि बहिणींनी केलेल्या खुलाश्यानुसार आरोपी मनोज ही तिचा मामा आहे की हे दोघे विवाहित आहेत, याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी करत आहेत.
#WATCH | "32-year-old woman, Saraswati Vaidya killed by 56-year-old live-in partner Manoj Sane |…" During the investigation, we have found out that the victim and accused were married and they had informed this to the victim's sisters also, they hid this from the others because… pic.twitter.com/vlpXvWq5qF
— ANI (@ANI) June 9, 2023