(रत्नागिरी)
शहरातील मिऱ्या येथील रेमंड रेस्ट हाउसजवळ दारूच्या नशेत पडलेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २४ मे रोजी सकाळी १०.१५ वा. घडकीस आली असून याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
महेंद्र सदानंद माचिवले (३०, रा. मिऱ्याबंदर, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्रला दारूचे व्यसन होते. २४ मे रोजी सकाळी एका नागरिकाने महेंद्रच्या नातेवाईकांना फोन करून महेंद्र हा दारू पिऊन रेमंड रेस्टहाऊस येथे पडलेला असून त्याला रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात नेत असल्याचे सांगितले. महेंद्रचे नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात गेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेंद्रला तपासून मृत घोषित केले.